Latest Jobs

दहावी बारावीचे निकाल जुलैमध्ये लागेल असा अंदाज

दहावी, बारावीचे निकाल जुलैमध्ये लागेल असा अंदाज


दहावी आणि बारावीचा निकाल लावण्यासाठीची प्रक्रिया वेगाने सतत सुरु आहेच, तसेच बाराविचा निकाल १५ जुलै च्या आत तर दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या शेवट्पर्यंतर लावणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी सोमवारी सांगितले आहे. 


दरवर्षी दहावी व बारावीचा निकाल हा जून मध्ये लागत असतो परंतु या वर्षी कोरोना (COVID-19) च्या पसरामुळे दहावी व बारावीचा निकाल हा उशिरा झालेला आहे. बारावीचे सर्व पेपर झालेले होते तसेच दहावीचा शेवटचा म्हणजेच भूगोलाचा पेपर बाकी होता तोही रद्द करण्यात आला होता. तर आता सर्व विद्यार्थ्यांचे निकालावर लक्ष लागून राहिले आहे. तसेच महाराष्ट्र राज्यमसधामिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांची विद्यार्थाना मोठा दिलासा दिला आहे.
दहावीचा निकाल लागल्यानंतर दीड महिने अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. हि प्रक्रिया शहरी भागात ऑनलाईन असेल तसेच ग्रामीण भागात ऑफलाईन असू शकते.
 1 comment:

Please do not enter any spam link in the comment box.